महाराष्ट्र

भारतीय संविधान जागृतीसाठी महाविद्यालयीन स्तरावर कार्यशाळेची आवश्यकता शैला यादव

राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयात विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.

भारतीय संविधान जागृतीसाठी महाविद्यालयीन स्तरावर कार्यशाळेची आवश्यकता

शैला यादव

S m news संपादक – महेश यादव

औंध दि. ६

राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयात विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून औंध येथील सामाजिक विकास फाउंडेशनच्या संस्थापिका शैला यादव या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औंध शिक्षण मंडळ, औंध चे सहसचिव मा. प्रा. निकम संजय सर होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भंडारे सर व सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय रहिमतपूर येथील भूगोल विभाग प्रमुख प्रा.प्रदीप सावंत सर यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती . शैला यादव म्हणाल्या की बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्याबरोबरच त्यांचे विचार समाजाच्या तळागाळात रुजवणे गरजेचे आहे. भारतीय संविधानामधील मूल्य जोपासण्याचे काम आजच्या युवकांवर आहे. त्यासाठी भारतीय संविधान जागृतीच्या कार्यशाळा महाविद्यालयीन स्तरावर आयोजित व्हाव्यात. स्त्री सक्षमीकरण संविधानातील अधिकारामुळे होत आहे. पण काही समाजात अजूनही अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यामुळे स्त्रियांचा शैक्षणिक विकास खुंटला आहे. कायदा व व्यवहार यांची सांगड घालून समाज परिवर्तन करावे. समाज विकास संस्थांनी शासकीय अनुदान बरोबरच ज्यांना हक्क व अधिकार नाकारले जातात अशा लोकांसाठी काम करणे गरजेचे आहे. प्रा. संजय निकम यांनीही भारतीय संविधानाचे महत्त्व पटवून दिले. भारतीय संविधान जागृतीसाठी महाविद्यालयीन स्तरावर विविध प्रकारची व्याख्याने, कार्यशाळा, प्रश्नमंजुषा इत्यादी कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे. समाजातील वंचित घटकांचे शिक्षण पैशाअभावी थांबू नये. सुशिक्षतांनी सामाजिक बांधिलकी जोपासली तरच बाबासाहेबांचे स्वप्न सत्यात उतरेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सचिन सरदेसाई यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नामदेव तेलोरे यांनी केले .कार्यक्रमाचे आभार डॉ.अजित देसाई यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!