लोकल न्यूज़

वनपरिक्षेत्र पाटण अंतर्गत मोजे माजगाव येथे मानव वन्य जीवन संघर्ष विषयी ग्रामसभेतून जनजागृती करण्यात आली.

पाटण प्रतिनिधी- विक्रम महिपाल

दिनांक 30 11 2025 रोजी वनपरिक्षेत्र पाटण मधील मौजे माजगाव तालुका पाटण येथील प्रवीण राजाराम पाटील वया 38 यांचे जाळी मारलेल्या कोंबड्यांचे शेडमध्ये वन्य प्राणी बिबट्या बसला होता जाळीतून निघत असलेले असताना वन्यप्राणी बिबट्याने प्रवीण राजाराम पाटील यांच्यावर हल्ला केला त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते याची दखल घेऊनच माननीय श्री अमोल सातपुते उप वनरक्षक वन विभाग सातारा यांचे मार्गदर्शनाखाली घटना घडल्याचे सभोवताली ॲनिमल आऊट या प्रतिबंध औषधाची फवारणी करण्यात आली तसेच या भागाचा रात्रगस्त मध्ये वाढ करून जनजागृती करण्यात आली आहे याच प्रमाणे सदरचे गावांमध्ये माहितीपर भिंती पत्रके लावण्यात आलेले आहेत

तसेच आज दिनांक ०३ १२ २५ रोजी माननीय श्री जयश्री जाधव सहाय्यक वनानिरीक्षक सातारा ने पाटण वनक्षेत्रात कडील अधिकारी व स्टाफ यांचे उपस्थितीमध्ये मौजे माजगाव मानव वन्य जीवन संघर्ष विषयक जनजागृतीचे अनुषंगाने ग्रामसभेत आयोजन करण्यात आलेले होते यावेळी उपस्थित ग्रामस्थांची बिबट्याची जीवन शैली व बिबट्याचे अन्नसाखळी तील महत्त्व मानव बिबट्या संघर्ष कारणे मानव बिबट्या संघर्षाचे परिणाम मानव बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी करावयाचे उपायोजना बिबट्या वावर क्षेत्रातील घ्यावयाची खबरदारी याबाबत सखोल माहिती देण्यात आली यावेळी ग्रामस्थांकडून वेगवेगळ्या शंका उपस्थित करण्यात आल्या याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी निरसन केले यावेळी ग्रामस्थांनी वनविभागास विषयी निगडित असलेल्या तक्रार यांचे कारण कामी सातारा वनविभागाच्या नियंत्रण कक्ष व आपत्कालीन क्रमांक 0 21 62- 220058 या संपर्क साधण्याचे आवाहनही केले त्याचप्रमाणे इकडील जलद बचाव कृती दलातील श्री गणेश काळे यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना वन्य प्रमाण बाबत घ्यावयाची खबरदारी सखोल माहिती दिली यावेळी गावातील सौ रेखा अंकुश जाधव सरपंच जळगाव सौ सुजाता संतोष इमने उपसरपंच माजगाव सौ सुरेखा आखाडे ग्रामपंचायत अधिकारी व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!