खेल

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर  अंतर्गत विभागीय क्रिकेट सामने उत्साहात संपन्न

महेश यादव

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

अंतर्गत विभागीय क्रिकेट सामने उत्साहात संपन्

औंध दिनांक : २२

राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयाच्या श्री यमाई स्टेडियमवर शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विभागीय पुरुष क्रिकेट सामने उत्साहात संपन्न झाले. या स्पर्धेत जिल्ह्यातील

विविध महाविद्यालयातील 16 संघ सहभागी झाले होते. विजयी संघ: प्रथम क्रमांक – गव्हर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज कराड,द्वितीय क्रमांक – वेणुताई चव्हाण कॉलेज कराड, तृतीय क्रमांक – राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध, चतुर्थ क्रमांक – के .बी .पी. इंजीनियरिंग कॉलेज वर्ये ,सातारा या संघानी पटकावले. सदर क्रिकेट सामन्याचा

ट्रॉफी व बक्षीस वितरण समारंभ औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त मा. हणमंतराव शिंदे, सचिव श्री. प्रदीप कणसे, औंध जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ. मनीषा ताई फडतरे, युवा उद्योजक हिम्मतराव फडतरे, युवा कार्यकर्ते प्रशांत किर्तीकर, पैलवान सागर सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत भंडारे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुधाकर कुमकर व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला .

सर्व विजयी संघाचे अभिनंदन उपस्थितांतर्फे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व आयोजन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.सुधाकर कुमकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!