औंध-31 औंध येथे आश्रम शाळेत (भटके विमुक्त दिन) मोठ्या उत्साहात पार पडला
( भटके विमुक्त दिनानिमित्त वृक्षारोपण ही करण्यात आले)

प्रतिनिधी— महेश यादव
औंध– शिवगर्जना प्रतिष्ठान औंध संचालित प्राथमिक महाविद्यालय औंध येथे दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी भटके विमुक्त दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रम हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणारे श्री वैभव यादव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर इतर पाहुण्यांचा ही सत्कार करण्यात आला तसेच
आपल्या आरोग्याची ज्यांना नेहमी काळजी असते अशा आपल्या अशा सेविकांचाही सत्कार या कार्यक्रमादरम्यान करण्यात आला.
जिल्हास्तरीय स्पर्धेचे प्रमाणपत्र या कार्यक्रमादरम्यान वितरण करण्यात आले. तसेच रांगोळी स्पर्धा घेण्यात आली होती या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
भटके विमुक्त दिनानिमित्त मुलांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी मुलांची आरोग्य तपासणी ही या कार्यक्रमादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेसावळी यांच्या माध्यमातून करण्यात आले.
वृक्ष आपल्या आयुष्यात किती मोलाचे आहे वृक्ष लावल्यानंतर आपल्या कोण कोणते फायदे होणार
व भटके विमुक्त याविषयी माहिती या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वैभव यादव यांनी दिली
यावेळी उपस्थित अशा सेविका सौ शबाना शेख, सौ इंदुताई पवार, सौ शुभांगी बागल,संगीता घोरपडे, सौ वंदना इंगळे, सौ सविता कुंभार प्राथमिक माध्यमिक विभागाचे श्री जाधव सर,श्री धडस सर, आणि विद्यार्थी,विद्यार्थिनी, शिक्षक सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते .