औंध 15–🇮🇳 *शिवगर्जना प्रतिष्ठान औंध संकुलामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा* 🇮🇳
प्रतिनिधी -- महेश यादव

औंध — 15 शिवगर्जना प्रतिष्ठान औंध संचलित प्राथमिक, माध्यमिक आणि स्व.संभाजीराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय औंध ता.खटाव, येथे आज शुक्रवार दि. 15 ऑगस्ट 2025रोजी स्वातंत्र्याचा 79 वा स्वातंत्र्यदिन संपन्न झाला.
या प्रसंगी ध्वजपुजन मा. श्री. काकासाहेब घार्गे (अध्यक्ष,आजी माजी सैनिक संघटना, औंध) व ध्वजारोहन मा.श्री.जनार्दन दरेकर साहेब(चेअरमन,सद्गुरू शिक्षण संस्था वडूज)यांच्या हस्ते करणेत आले .
यावेळी मा.श्री .जनार्दन दरेकर साहेब यांचे कडून शाळेच्या ग्रंथालयास पुस्तके,ग्रंथ भेट देण्यात आले. त्यानिमित्त त्यांचा सत्कार शाळा संकुलाच्या वतीने श्री.वसंत पवार मेजर (ग्रा.सदस्य) यांनी केला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.राजाभाऊ देशमुख ( बापू), मा.रमेश चव्हाण साहेब,डॉ.विलास साळुंखे साहेब,श्री आलीम मोदी ,श्री.वसंत मेजर,श्री. सह्याद्री देशमुख, मेजर संदेश रणदिवे,
पत्रकार श्री. महेश यादव,श्री. संभाजी कुंभार,श्री. प्रभाकर हिंगे,सौ.संध्या देशमुख,श्री.चंद्रकांत पवार,श्री.बाबा गोसावी, नांदोशी सरपंच श्री. जाधव,श्री.बाळासाहेब घाडगे,श्री.जयवंत देशमुख,श्री.प्रकाश गायकवाड, श्री.सुधीर फडणीस,श्री.अर्जुन यादव,श्री.जोतीराम कुंभार,श्री.केशव इंगळे. तसेच संस्था संचालक मंडळ,आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालकवर्ग,मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते .