
प्रतिनिधी — महेश यादव
औंध — औंध पोलीस स्टेशन कार्यालयीन क्षेत्रामध्ये गेल्या काही महिन्यापासून चोरीची मोबाईल तक्रारी होत्या त्यामधील सुमारे तीन लाख रुपये किमतीचे 23 मोबाईल स. पो. नि. श्री अविनाश मते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी शोधून काढले.
याबाबत स्पष्टीकरण असे गेल्या दोन महिन्यात सुमारे 23 नागरिकांच्या तक्रारी होत्या त्या स. पो. नी. श्री अविनाश मते साहेब यांच्या सीईआर पोर्टल, व तांत्रिक विभागाच्या सहाय्याने काही बाबींचे विश्लेषण करून या सुमारे तीन लाख रुपये किमतीच्या 23 विविध मोबाईलच्या मोबाईल शोधण्यास पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले.
या कामे स.पो.नी. श्री. अविनाश मते यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल मेघा फडतरे, अतुल देशमुख, महेश पवार, यांनी परिश्रम घेतले हे सापडलेले मोबाईल नागरिकांना परत व्यवस्थित सोपवण्यात आले यावेळी स. पो.नी. श्री अविनाश मते यांनी जर अशा प्रकारचे कोणाचे तक्रार असल्यास त्वरित पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असेही आवाहन यावेळी केले.