
औंध = औंध पोस्ट ऑफिस कार्यालय मध्ये वारसांना धनादेश सुपूर्त
प्रतिनिधी = महेश यादव
औंध – भारतीय डाक विभागाच्या डाक विम्यातून अपघाती निधनानंतर वारसांना वडील व आई यांना 3 लाख 70 हजार 36 रुपये रकमेचा धनादेश नुकताच औंध पोस्ट ऑफिस कराड विभागामार्फत वितरित करण्यात आला.
कुमार प्रसाद राजेंद्र सुतार यांनी टपाल जीवन विम्याची ग्राम संतोष पॉलिसी मधील दोन वर्षांपूर्वी घेतली होती त्यांना दरमहा 1636 रुपये हप्त्याचे विमा पॉलिसी त्यांनी एक मार्च 2025 पर्यंत भरली होती परंतु त्यांचे 8 एप्रिल 2025 रोजी वडूज येथे झालेल्या भीषण अपघातात निधन झाले त्यानंतर त्यांनी क्लेम साठी अर्ज केले होता
वारसदार सौ भारती राजेंद्र सुतार या यांच्या मातोश्री व वडील श्री राजेंद्र सुतार यांच्या नुकताच 29 7 2025 रोजी 3 लाख 70 हजार 36 रुपये धनादेश औंध पोस्ट ऑफिस मध्ये सौं पूनम प्रकाश कांबळे कर्मचारी स्वप्निल ननवरे पोस्टमन प्रतीक कदम व इतर कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत नुकताच औंध पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये सुपूर्त करण्यात आला.
डाक जीवन विमा योजनेकरिता वय वर्ष 18 ते 55 वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते
या योजनेचा लाभ पदवीधर सरकारी राज्य कर्मचारी सुद्धा घेऊ शकता.
याकरिता औंध पोस्ट ऑफिस तसेच कर्म कार्यालयीन कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करार डाक विभागाचे अधीक्षिका श्री स्वाती दळवी यांनी केले