औंध मधील जिल्हा परिषद शाळेचे दयनीय अवस्था ( पै.कुलदीप इंगळे)
अतिशय बिकट अवस्थेत शिकत आहे विद्यार्थी

औंध मधील जिल्हा परिषद शाळेचे दयनीय अवस्था
( पै.कुलदीप इंगळे
अतिशय बिकट अवस्थेत शिकत आहे विद्यार्थी
प्रतिनिधी– महेश यादव
आज जिल्हा परिषद शाळेमध्ये बऱ्यापैकी सुविधा ह्या चांगल्या पद्धतीच्या आपणास पाहायला दिसत असताना आज औंध सारख्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या बाबतीत जीव घेणे खेळ होत असल्याचे पै. कुलदीप इंगळे यांना निदर्शनास आले.यामध्ये पै. कुलदीप इंगळे व समस्त पालक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या म्हणण्यानुसार असा जीवघेणा खेळ विद्यार्थ्यांच्या बाबतीत करू नका.
प्रामुख्याने मागणे अशा की
1) जिल्हा परिषद शाळा औंध पूर्ण वर्ग लिकेज आहेत तसेच पावसाळा सुरू असलेले वर्ग लिकेज असले कारणाने सर्व वर्गात पूर्ण पाणी साचत आहे.,
2)याचबरोबर सर्व वर्गातील फरशा फुटल्या आहेत व खचले आहेत.
3) बसण्यासाठी बेंच उपलब्ध नाही
4) कोणत्याही पायऱ्यांवर रेलिंग नाही
5)तसेच शाळेतील मुलांना मनोरंजनासाठी व खेळण्यासाठी कोणतेही साहित्य उपलब्ध नाही
अशा प्रकारच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात अशी सर्व पालकांची व शिक्षकांची व कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे.
अशा प्रकारच्या भीतीदायक वातावरणात शिकत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्य बिघडत असल्याचे निदर्शनास आले.
जर या मागण्या लवकर पूर्ण झाल्या नाहीत तर पै. कुलदीप इंगळे यांनी आम्ही उपोषणाला बसू असेही सांगितले.
यावेळी उपस्थित शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.