आयडीबीआय बँकेच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षणामुळे प्रशिक्षणार्थी हा यशस्वी उद्योजक व उत्कृष्ट कारागीर नक्कीच बनतो
श्री संतोष साळुंखे (महाराष्ट्र नाभिक महामंडळ सातारा जिल्हाध्यक्ष
आयडीबीआय बँकेच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षणामुळे प्रशिक्षणार्थी हा यशस्वी उद्योजक व उत्कृष्ट कारागीर नक्कीच बनतो
श्री संतोष साळुंखे
(महाराष्ट्र नाभिक महामंडळ सातारा जिल्हाध्यक्ष )
प्रतिनिधी — महेश यादव
आयडीबीआय बँक सातारा ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र सातारा यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ब्युटी पार्लर आधुनिक सलून व्यवसायाच्या समारोप कार्यक्रमावेळी ते बोलत होते
आयडीबीआय बँकेचे प्रशिक्षण प्रमुख श्री रासकर साहेबांचा समाजातील असलेल्या गरीब आणि होतकरू मुला मुलींना प्रशिक्षणार्थ्यांना मदतीचा हात हा सतत यशाकडे नेण्यास मदत करतो हे स्पष्ट दिसून येते
त्याचबरोबर बँकेच्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या प्रशिक्षणाचा व्यवसाय उभारणीसाठी त्याच्या अत्यल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते व त्याला व्यवसाय उभारण्यासाठी नक्कीच मदत होते याबद्दल नाभिक समाज आपला ऋणी आहे.
तसेच बँकेचे जेष्ठ संचालक आदरणीय श्री करंदीकर सरांचेही मार्गदर्शन या सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडत असते असेही माननीय श्री संतोष साळुंखे यांनी यावेळी आपल्या भाषणातून बोलून दाखवले.
या समारोपदरम्यान प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी उपस्थित माननीय श्री संतोष साळुंखे (जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ सातारा जिल्हा) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच आयडीबीआय बँकेचे प्रशिक्षण केंद्रप्रमुख श्री रासकर साहेब बँकेचे जेष्ठ संचालक आदरणीय श्री करंदीकर सर प्रशिक्षण प्रशिक्षक सौ कोमल दबडे मॅडम, सौ देशपांडे मॅडम, सौ जाधव मॅडम व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते.