मेढा — मेढा येथिल चिकन दुकानातून दारू जप्त विक्रेता गेला पळून.
विलासबाबा जवळ यांची धडक कारवाई
मेढा येथिल चिकन दुकानातून दारू जप्त विक्रेता गेला पळून.
विलासबाबा जवळ यांची धडक कारवाई
प्रतिनिधी — जितीन वेंधे
मेढा —
जावळी तालुक्यातील अवैध दारू विक्री बाबत दोनच दिवसापूर्वी प्रसिध्दी पत्रकाद्वारे उत्पादन शुल्क विभाग व पोलिस खात्यावर मनथैलीचे गंभीर आरोप केले असताना आज सकाळीच व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक व दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते श्री विलासबाबा जवळ यांनी मेढा येथिल वनविभाग कार्यालयाच्या कपांउंडला लागून असलेल्या चिकनच्या दुकानावरून दारू विक्री करीत असताना जब्बार पठाण नामक व्यक्तीला रंगेहात पकडले.एका ग्राहकाला दारू देत असताना विलासबांबानी त्याला पाहिले असता गाडीवरून उतरून चिकन दुकानात पोहचेपर्यंत विक्रेता जब्बार पठाण पळून जाण्यात यशस्वी झाला, पण तेथे ग्राहक उभाच होता.
विलासबाबा यांनी स्वतःचा मोबाईल काढत सदर ठिकाणी शोध घेतला असता पांढर्या रंगाच्या पिशवीत साधारण ४० दारूच्या बाटला दिसून आल्या. ती पिशवी चिकन दुकाना समोरच ओतून त्याचेही चित्रीकरण करण्यात आले.
विलासबाबा जवळ स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करीत असताना उत्पादन शुल्क खाते व पोलिस खाते मात्र निद्रिस्त अवस्थेत असल्याचे बघायला मिळत आहे.
विलासबाबा जवळ यांनी यापुढेही आंदोलन सुरूच रहाणार असून व्यसनमुक्त युवक संघटना १५ ऑगष्ट २०२५ नंतर हा सर्व जप्त केलेला दारूचा माल उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांचा नाकर्तेपणा दाखविण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना.अजीतदादा पवार यांना भेट देणार असल्याचे सांगितले.