वेटणे — 21 आदरणीय श्री गजानन मोतीराम राऊत यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार जाहीरं
प्रतिनिधी --महेश यादव

वेटणे — 21 आदरणीय श्री गजानन मोतीराम राऊत यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार जाहीरं
प्रतिनिधी –महेश यादव
वेटणे 21– सपकाळ नवयुवक मंडळ( रांजणी)
- ता.जावली, जि.सातारा. यांच्यामार्फत विविध क्षेत्रातील कार्यक्षम असणाऱ्या अशा आदरणीय समाज घटकांना दरवर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्यामध्ये बहुदा सामाजिक राजकीय क्रीडा स्वयंसेवा अशा पुरस्काराने बऱ्याच समाज घटकांना आतापर्यंत सन्मानित करण्यात आलेले आहे
अशाच सन्मानित करणाऱ्या यादीमध्ये आदरणीय श्री गजानन मोतीराम राऊत (रा.वेटने) यांनाही समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गजानन राऊत यांच्या बद्दल सांगायचे झाले तर हे एक नाभिक समाजातील व्यक्तिमत्व जे की मदतीसाठी धावून जाणारे व्यक्तिमत्व समाजामध्ये नावाजलेले असे दिसून येते.
यामध्ये विवाह च्या काही बाबी असू देत समाजकारणाच्या काही बाबी असू देत केव्हा एखाद्याला मदतीचा हात असू देत अशा प्रत्येक विषयांमध्ये अग्रेसर आणि मदतीसाठी धावून जाणारे असे हे समाज रत्न श्री गजानन मोतीराम राऊत यांना या विषयांतर्गत समाज भूषण हा पुरस्काराने गौरवण्यात आले.
जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय कार्याच्या माध्यमातून विवाह जुळणीचे काम उत्तमरीत्या केल्या मुळे, तसेच राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या जनसंपर्क पदाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचलित असणारे असे व्यक्तिमत्व. की त्यांना समाजाच्या अक्षदाचार्य या नावानेही ओळखले जाते. 1995 सालापासून चंद्रसेन नाभिक वधू वर मंडळाचे अध्यक्ष पद ही त्यांनी आज पर्यंत भूषवले आहे.
तसेच नाभिक समाजाबद्दल असणारे आस्था, जिव्हाळा, तसेच कायम तत्पर असणारे असे हे व्यक्तिमत्व त्यांना या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल नाभिक समाजातूनही आनंदाचे वातावरण तयार झाले आहे व ठीक ठिकाणाहून त्यांच्या अभिनंदन व कौतुकही केले जाते.
सपकाळ नवयुवक मंडळ रांजणी याच्या माननीय अध्यक्ष महेंद्र सपकाळ यांच्या विचारातून असे सन्मानित जे घटक आहेत त्यांना त्यांच्या पुढील कार्यामध्ये नक्कीच ऊर्जा मिळते.
यावेळी उपस्थित माननीय आदर्श सरपंच सुनील सपकाळ यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी दत्ता सपकाळ, राजेंद्र सपकाळ, पांडुरंग राऊत,तसेच सुनील राऊत समस्त सपकाळ परिवार रांजणी ग्रामस्थ व वेटणे ग्रामस्थ उपस्थित होते.