सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरील बंदी हटवली, मात्र प्रशासनाचे कडक निर्देश
सातारा जिल्हा प्रशासनानं पर्यटकांना काही निर्बंध घातले आहेत.

औंध — सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरील बंदी हटवली, मात्र प्रशासनाचे कडक निर्देश
सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर, पाचगणीसह या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांवर दोन महिने पर्यटकांना बंदी घालण्याचा आदेश जिल्हा प्रशासनानं अखेर बंदी हटावली
प्रतिनिधी–महेश यादव
Satara News : सातारा जिल्हा प्रशासनानं पर्यटकांना काही निर्बंध घातले आहेत
सातारा:
सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर, पाचगणीसह या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांवर दोन महिने पर्यटकांना बंदी घालण्याचा आदेश जिल्हा प्रशासनानं अखेर बदलला आहे. महाबळेश्वर, पाचगणीसह सातारा जिल्ह्यातल्या प्रमुख पर्यटन स्थळांना 19 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्याचा आदेश जिल्हा प्रशासनानं दिला होता. हे वृत्त प्रसिद्ध होताच त्याचे जोरदार पडसाद उमटले.
साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी देखील या वृत्ताची दखल घेतली. त्यांनी शब्दरचना बदलून नवा आदेश दिला आहे. पर्यटनाचा आनंद घेताना अपघात होणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. त्याचबरोबर पर्यटकांना कोणत्याही स्वरूपाची बंदी नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. यापूर्वीचा आदेश चुकीचा असल्याचे दाखवून देताच प्रशासनानं हे नवे निर्देश दिले आहेत.धबधबे, धरण नदी येथे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रशासनानं बंदी घातली आहे.
पावसाळ्यातील पर्यटनासाठी येणा-या नागरीकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता मार्गदर्शक सूचना करताना प्रशासनाने पुढील बाबींवर निर्बंध घातले आहे
सातारा जिल्हा प्रशासनाचे नवे निर्देश
1) पावसामुळे वेगाने वाहणा-या पाण्यात उतरणे व पोहणे.
2) धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे,
3) पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे धबधबे, द-यांचे कठडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढणेस व कोणत्याही स्वरुपाचे चित्रिकरण करणे.
4) पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्यांचे परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे,
5) वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.
6) वाहन अतिवेगाने अथवा वाहतुकीस अडथळा होईल असे वेगाने चालविणे.
7) वाहनांची ने-आण करतांना बेदकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे.
8) सार्वजनिक ठिकाणी खाद्य पदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टीकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टीकचे साहित्या उघडयावर इतरत्र फेकणे.
9) सार्वजनिक ठिकाणी येणा-या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य अश्लिल हावभाव करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.
10) सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डीजे सिस्टम वाजविणे, वाहनातील स्पिकर/उफर मोठ्या आवाजात वाजविणे यामुळे ध्वनी प्रदुषण करणे.
11) ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदुषण होईल असे कोणतीही कृती करणे.
12) धबधबे, धरणे व नदी आदी परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करणे (अत्यावश्यक सेवेतील वाहन वगळून)
ही मार्गदर्शक आचारसंहिता ही पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी असून पर्यटनाचा आनंद घेत असताना कोणतीही दुखापत इजा होणार नाही अथवा पर्यटन जीवावर बेतणार नाही, याची दक्षता घ्या, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.