
Pahalgam Terror Attack : घुसून मारलं, दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय सैन्याचं ‘ऑपरेशन सिंदूर’ फत्तेभारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई केली आहे. याच अड्ड्यांवर पाकिस्तानने भारतात हल्ल्याचा कट रचल्याची माहिती भारतीय लष्करातर्फे देण्यात आली आहे. भारतीय सैन्याने या कारवाईत दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर कारवाई केली आहे.
May 07, 2025
Pahalgam Terror Attack : घुसून मारलं, दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय सैन्याचं ‘ऑपरेशन सिंदूर’ फत्ते
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 26 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली होती. दहशतवादी संघटना लष्कर ए तोएबाशी संलग्न कँपने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारल्यानंतर पाकिस्तानचा या हल्ल्यातील सहभाग प्रकर्षाने समोर आला होता.
या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांना दहशतवाद्यांनी गोळी घालून ठार मारलं होतं. या खडतर प्रसंगात संपूर्ण राजकीय पक्षांनी केंद्र सरकारला आपला पाठींबा देत पाकिस्तानविरुद्ध कारवाईसाठी पाठींबा दिला होता. भारतीय सैन्यानेही या कारवाईला सडेतोड प्रत्युत्तर देत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई करत ऑपरेशन सिंदूर फत्ते करत 26 निष्पाप भारतीयांच्या हत्येचा बदला घेतला आहे