लोकल न्यूज़
औंध पोलीस स्टेशन कडून गुटखा मुद्देमाल नष्ट

औंध पोलीस स्टेशन कडून गुटखा मुद्देमाल नष्ट
औंध प्रतिनिधी– महेश यादव
औंध — दिनांक 15.4.2025 रोजी औंध पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री
अविनाश मते साहेब यांनी काही दिवसांपूर्वी कार्यवाही मध्ये
दोन गुन्ह्यातील सुमारे 7.50 लाख रुपये किमतीचा गुटखा मुद्देमाल मा. जप्त केला होता. तो मुद्देमाल नष्ट करण्यासाठी काही अडचणींना समोर जावे लागत होता.
तो जप्त केलेला मुद्देमाल हा
न्यायालयाच्या आदेशाने व अन्न व औषध प्रशासन अधिकारी रुपनर मॅडम सातारा यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे नष्ट करण्यात आला.
यावेळी उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अविनाश मते साहेब, रुपनर मॅडम, ग्रामस्थ, व समस्त पोलीस कार्यालयीन अधिकारी होते.