वडूज मध्ये झालेल्या अपघातात औंध मधील दोन तरुण मित्रांचे मृत्यू
शिवम, व प्रसादच्या जाण्याने औंध मध्ये शोकाकुल वातावरण

औंध प्रतिनिधी – महेश यादव
औंध –औंध येथील शिवम शिंदे व प्रसाद सुतार या दोघां मित्रांच्या अपघाती निधनामुळे औंध परिसरात मंगळवारी शोककळा पसरली होती. औंध नागरी मध्ये युवक वर्गाला हा मोठा घक्काचं होता. औंध मध्ये सर्व आर्थिक व्यवहार बंद ठेवण्यात आले होते तसेच मंगळवारी भरणारा आठवडी बाजार ही रद्द करण्यात आला होता. दरम्यान दोन्ही युवकांवर हजारी नागरिकांच्या उपस्थितीत एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांमध्ये अनेकांना अश्रू अनावर झाले.
याबाबत अधिक माहिती अशी, येथील औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधीचे व निकटवतीय, नेते हणमंतराव शिंदे यांचे कणीस्ट चीरंजीव शिवम शिंदे व श्री यमाई श्रीनिवास विद्यालयातील कर्मचारी राजेंद्र यांचा मुलगा प्रसाद ऊर्फ बाबू आपल्या मित्रांसमवेत कामानिमित सोमवरी रात्री औंध येथून वडूज मधून दहिवडी कडे निघाले होते. त्यावेळी त्यांच्या स्विफ्ट कारचा वडूज दहिवडी रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिरा नजीक भीषण अपघात झाला. त्यामध्ये शिवम शिंदे व प्रसाद सुतार यांचा जागीच मृत्यू झाला तर गाडीतील अन्य दोन युवक जखमी झाले.
रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास हा अपघात झाला. ही बातमी औध सह खटाव तालुक्यात समजताच वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात युवक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळी औंध येथे दीघांचे पार्थिव आणल्यानंतर औध गावात शोकांकला होती.
हणमंतराव शिदे यांचा व्यवसाय सांभाळणारा शिवम हा धाकटा मुलगा अचानक गेल्याने शिंदे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला तर राजेंद्र सुतार यांचा प्रसाद हा एकुलता एक मुलगा होता, प्रसादाच्या जाण्याने त्याच्या आईवडील कुटुंबीयांना मोठा घक्का बसला उच्चशिक्षित स्नेहपूर्ण बोलणारा शिवम शिंदे व प्रसाद सुतार यांच्या आकस्मिक जाण्याने तरुण वर्गातून दुःख व्यक्त केले जात आहे
दोघांच्या अपघाती निधनाने गावांमध्ये दुःख व्यक्त केली जात आहें . यावेळी विविध मान्यवरांनी दुःख व्यक्त करुन श्रद्धांजली अर्पण केली.