वडूज –संविधान संघर्ष समिती (खटाव) यांची धरणे आंदोलन
वडूज ---बिहार राज्यातील बौद्धगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी यासाठी शुक्रवार दि.4-4 2025 रोजी सकाळी 10.30वाजता तहसीलदार कार्यालय खटाव येथे धरणे आंदोलन व मोर्चा काढण्यात येणार आहे.

वडूज प्रतिनिधी –लाला साहेब माने पाटील
भारत देशातील बिहार राज्यातील बौद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात नसून तेथील ब्राह्मणांच्या ताब्यात असल्याने महाबोधी महावीर हे बौद्धांच्या ताब्यात मिळावी यासाठी अनेकदेशी प्रयत्न चालू आहेत सदर देशव्यापी आंदोलनाचे स्वरूप महाबली टेन क्लास टेंपल ॲप 1949 रद्द करण्यात यावा तसेच संविधानातील आर्टिकल 25 व 26ने यांनी दिलेला धार्मिक अधिकारांचे हनन होत आहे त्यामुळे तालुक्यातील समस्त आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते विविध पक्षातील पदाधिकारी सामाजिक कार्यकार्ते विविध गावांची जयंती मंडळे समस्त भीमसैनिक महिला यांच्या वतीने खटाव(वडुज) तहसील कार्यालयासमोर एक दिवशी धरणे आंदोलन व निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवार दि. ४-४-२०२५ रोजी सकाळी १०.३०उपस्थित रहावे असे आवाहन मा. गणेश भोसले, अजित नलवडे, नगरसेवक तुषार बैले, अर्जून भालेराव, भगवान मोरे, महिला नेत्या गौतमी मसणे, मिलिंद रणदिवे यांनी सांगितले.