करंडेवाडी गावचे सुपुत्र डॉक्टर बाळसिंग खंडूसिंग राजपूत यांचा नागरि सत्कार
औंध , 18 मार्च रोजी करांडेवाडी तालुका खटाव, जिल्हा सातारा गावचे सुपुत्र डॉक्टर, बाळसिंग खंडूसिंग राजपूत यांची आयपीएस पदी पदोन्नती झाली त्याबद्दल माळी मळा येथील नागरिकांनी डॉक्टर बाळसिंग खंडू सिंग राजपूत यांचा गोड नागरी सत्कार केला.

करंडेवाडी गावचे सुपुत्र डॉक्टर बाळसिंग खंडूसिंग राजपूत यांचा नागरि सत्कार
औंध प्रतिनिधी( महेश यादव )
औंध , 18 मार्च रोजी करांडेवाडी तालुका खटाव, जिल्हा सातारा गावचे सुपुत्र डॉक्टर, बाळसिंग खंडूसिंग राजपूत यांची आयपीएस पदी पदोन्नती झाली त्याबद्दल माळी मळा येथील नागरिकांनी डॉक्टर बाळसिंग खंडू सिंग राजपूत यांचा गोड नागरी सत्कार केला
त्यांनी गडचिरोली मिरज सोलापूर मुंबई झोन 7. येथे पोलीस उपायुक्त म्हणून सेवा बजावले आहे.तसेच त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सायबर क्राईमचे पहिले पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावली.. सध्या ते माननीय. एकनाथ शिंदे साहेब यांचे ओएसडी म्हणून कार्यरत आहेत .. त्यांचे शिक्षण. औंध येथे बारावी पर्यंत झाले त्यांनी. राहुरी कृषी विद्यापीठ. येथे M.Tech पदवी मिळाली आहे तसेच. मुंबई येथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथून सायबर क्राईम मध्ये PHD पदवी प्राप्त केली आहे. यावेळेस उपस्थित नागरिक संदीप यादव,मारुती यादव,आनंद यादव, महेश यादव,धनाजी पाटोळे, सचिन राऊत, गजानन राजपूत, विनोद राजपूत, समस्त औंध व औंध विभाग ग्रामस्थ यांनी डॉक्टर बाळसिंग राजपूत यांना आयपीएस पदोन्नती झाल्याबद्दल व पुढील कार्यास यशोगती , उन्नती लाभो अशी शुभेच्छा दिल्या