औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या स्थानिक सल्लागार समिती सदस्यपदी ज्ञानेश्वर पवार
औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या स्थानिक सल्लागार समिती सदस्यपदी ज्ञानेश्वर पवार
औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या स्थानिक सल्लागार समिती सदस्यपदी ज्ञानेश्वर पवार
औंध
(प्रतिनिधी):- महेश यादव
केंद्राच्या स्थानिक सल्लागार समिती सदस्यपदी ज्ञानेश्वर पवार यांची निवड करण्यात आल्याचे पत्र कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहे.
ज्ञानेश्वर पवार हे भारतीय जनता पार्टीचे क्रियाशील कार्यकर्ते आहेत. सातारा जिल्ह्याचे भाजपा युवा मोर्चाचे ते उपाध्यक्ष आहेत. ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर
जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचे ते निकटवर्तीय आहेत. यापूर्वीही त्यांच्या कामाचा उत्साह पाहुन ना. जयकुमार गोरे यांनी
विविध ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. पळशी, ता. खटाव येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असलेले ज्ञानेश्वर पवार भारतीय जनता पक्षासाठी पूर्ण वेळ काम करत असल्याने त्यांच्या कामाची दखल घेऊन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नियुक्ती केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन केले