विद्यार्थ्यांनी निसर्गाशी नातं जोडलं पाहिजे विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी योगदान दिले पाहिजे राहुल पवार…….
हेडलाईन... विद्यार्थ्यांनी निसर्गाशी नातं जोडलं पाहिजे विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी योगदान दिले पाहिजे राहुल पवार.......
.. सातारा कराड प्रतिनिधी- कुलदीप मोहिते
. कराड तालुक्यातील हेळगाव येथे पंचक्रोशी दत्त विद्यामंदिर येथे नैसर्गिक कलर कार्यशाळा घेण्यात आली यावेळी गोवा येथील विवेकानंद पर्यावरण फौज व कृष्णा नदी चळवळ कराड यांच्यावतीने नैसर्गिक कलर कार्यशाळा संपन्न झाली यावेळी गोव्याचे पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर व सूर्यकांत गावकर वनस्पती अभ्यासक यांनी विविध पाना फुलापासून झाडांच्या बीजापासून तयार केलेले नैसर्गिक कलर याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले काजू व इतर झाडांपासून तयार केलेले नैसर्गिक कलर प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवण्यात आले कृष्णा नदी चळवळ पर्यावरण प्रेमी राहुल पवार यांनी नैसर्गिक कलर याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले यावेळी देशातील 315 नद्या दूषित आहेत महाराष्ट्रातील 54 नद्या दूषित आहेत पाण्याची वाढती टंचाई निसर्गाचा नाश निसर्ग चक्र जागतिक तापमान वाढ नदी चळवळ यासंदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी नैसर्गिक कलर फायदे पर्यावरणाचा समतोल केमिकल कलर मुळे होणारे दुष्परिणाम याविषयी माहिती देण्यात आली यावेळी नदी चळवळ व नदी चळवळीतील निसर्गचक्र जागतिक तापमान वाढ विविध गोष्टी विद्यार्थ्यांच्या मध्ये चर्चा व प्रबोधन करण्यात आले या कार्यक्रमासाठी पंचक्रोशी दत्त विद्यामंदिर हेळगाव मुख्याध्यापक श्री आर सी पवार उपशिक्षक देशमुख सर काकडे सर पाटील कांबळे सर रावते मॅडम कृष्णा नदी चळवळीचे आबासाहेब चव्हाण विजय जगताप अशोक सुतार पत्रकार अनिल मोरे रूपाली सावंत राहुल पवार विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सानिका जाधव अनुष्का सूर्यवंशी सृष्टी जगदाळे जानवी माने या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक काकडे सरांनी आभार कांबळे सर व्यक्त केले