दिनांक 1 जानेवारी 2026 रोजीआज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोरेगांव आगरमध्ये सुरक्षितता अभियान 2026
प्रतिनिधी -मेहमुद्दीन शेख
- दि. 1 जानेवारी 2026 रोजीआज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोरेगांव आगरमध्ये सुरक्षितता अभियान 2026 या निमित्ताने सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून तसेच प्रमुख पाहुणे विभागीय वाहतूक अधिकारी सौ शुभांगी धुमाळ , कोरेगाव मधील औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षक खान सर व विजय भोसले सर या सर्वांनी दीपप्रज्वल करून या अभियान ची सुरुवात केली.
जानेवारी महिन्यात राज्य भरात अपघात सुरक्षितता अभियान राबविण्यात येते . या अभियानांतर्गत सर्व चालकांचे व यांत्रिक कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्यात येते.
या निमित्ताने औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षक खान सर व विजय भोसले सर यांनी स्वतः ची व प्रवाशांची सुरक्षितता किती महत्त्वाची याचे महत्व या बद्दल मार्ग दर्शन केले.
विभागीय अधिकारी सौ शुभांगी धुमाळ मॅडम यांनी अपघाताने घडणारी घटना याचे गांभीर्य किती प्रमाणात होते आणि आपण कशा पद्धतीने अपघात टाळता येऊ शकतो हे अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून सांगितले.
कोरेगांव आगार व्यवस्थापक सौ निता जगताप मॅडम यांनी ही येणाऱ्या पाहुण्याचे आभार मानत कार्य क्रमाची सांगता केली.
यामध्ये कोरेगांव आगार स्थानक प्रमुख प्रल्हाद मदने,आगार वाहतूक निरीक्षक धीरज भुजबळ साहेब , वाहन परीक्षक प्रमुख सरफराज अत्तार, वरिष्ठ लिपीक विशाल ठोंबरे तसेच कोरेगांव आगारातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.




