लोकल न्यूज़

वनपरिक्षेत्र पाटण अंतर्गत माजगाव येथे मानव वन्यजीव संघर्ष विषयक ग्रामसभेने जनजागृती

पाटण प्रतिनिधी   विक्रम महिपाल

 

दिनांक३०-११-२५ रोजी वनपरिक्षेत्र पाटण मधील मौजे माजगाव ता पाटण येथील श्री प्रविण राजाराम पाटील वय ३८वर्ष यांच्या जाळी मारलेल्या कोंबड्यांच्या शेडमध्ये वन्य प्राणी बिबट बसला होता जाळीतून निघत असताना वन्य प्राणी बिबट यानें प्रविण राजाराम पाटील यांचेवर हल्ला केला त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण होते याची दखल घेऊन मा श्री अमोल सातपुते भा व से उपवनसंरक्षक विभाग सातारा , यांचे मार्गदर्शन खाली घटना घडले ते सभोवती ऑलिम्पिक आऊट या प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यात आली तसेच या भागात रात्र गस्त मध्ये वाढ करून जनजागृती करण्यात आली त्या प्रमाणे सदरचे गावामध्ये माहिती पर भिंती पत्रके लावण्यात आलीत

तसेच दिनांक ०३-१२-२०२५ रोजी मा श्रीम जयश्री जाधव सहाय्यक वनरक्षक वनी व कॅम्प सातारा व पाटण परीक्षेत्राकडील अधिकारी व स्टाफ यांचे उपस्थिती मध्ये मौजे माजगाव मानव वन्य जीव संघर्ष विषयक जनजागृती चे अनुषंगाने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित ग्रामस्थांना बिबट्या चि जीवन शैली बिबट्या चे अन्न साखळी तील म्हतव मानव बिबट संघर्ष कारणे व मानव बिबट संघर्ष परीणाम मानव बिबट संघर्ष टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना बिबट वावर क्षेत्रात घ्यावयाची खबरदारी या बाबत सखोल माहिती देण्यात आली

यावेळी ग्रामस्थांना वन विभागाशी निगडित असलेल्या तक्रारींचे निवारण कामी सातारा वन विभागाचे नियंत्रण कक्ष व आपत्ती कालीन क्रमांक ०२१६२-२२००५८ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले त्याचप्रमाणे इकडीन जलद बच्याव क्रुती दलातील श्री गणेश काळे यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना वन्य प्राण्याबाबत घ्यावयाची खबरदारी बाबत सखोल माहिती दिली,

यावेळी माजगाव चे सरपंच सौ रेखा अंकुश जाधव व उपसरपंच सौ सुजाता संतोष हिमणे ग्रामसेवक सौ सुरेखा आखाडे व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!