कांद्याचे भाव 55 टक्क्यांनी वाढले
महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.

कांद्याचे भाव 55 टक्क्यांनी वाढल
प्रतिनिधी – महेश यादव
महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.

कांद्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. नाशिकमधील लासलगाव बाजार समितीत नवीन खरीप कांद्याच्या सरासरी घाऊक किमती वाढलेल्या पाहायला मिळत आहे. शनिवारी २००० रुपये प्रति क्विंटल असलेला कांदा सोमवारी ३,१०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला. म्हणजे फक्त २ दिवसात कांद्याच्या किमतीत तब्बल ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य ग्राहकांच्या मात्र खिशाला आणखी चाप लागणार आहे.
सोमवारी लासलगाव एपीएमसीमध्ये सुमारे २,४०० क्विंटल नवीन खरीप कांद्याचा लिलाव करण्यात आला, ज्यामध्ये सर्वात कमी घाऊक किमत ५०० रुपये आणि सर्वाधिक ४,३०० रुपये प्रति क्विंटल होती. कांद्याच्या घाऊक किमतीत मोठी वाढ होण्याची अनेक कारणे आहेत. यातील महत्वाचं कारण म्हणजे बाजारात कांद्याच्या उपलब्धतेच्या तुलनेत मागणी जास्त वाढली. तसेच काही कंपन्या बियाणे उत्पादनासाठी कांदे खरेदी करत आहेत आणि मर्यादित पुरवठा असल्याने किमती वाढल्या आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, कापणी नुकतीच सुरू झाली आहे, त्यामुळे पुरवठा कमी आहे आणि किमती वेगाने वाढत आहेत.
शेतकरी मित्रानो, तुम्ही जे पीक पिकवल आहे.
१०,५४६ क्विंटल कांद्याचा लिलाव
डिसेंबरच्या दुसऱ्या सहामाहीत नवीन खरीप कांद्याचा नियमित पुरवठा वाढण्याची अपेक्षा आहे. याउलट, मार्च-एप्रिलमध्ये काढणी केलेला उन्हाळी कांदा सोमवारी लासलगावमध्ये सरासरी फक्त १,१०० रुपये प्रति क्विंटलला विकला गेला. एका व्यापाऱ्याने सांगितले की उन्हाळी कांद्याचे किमान आणि कमाल घाऊक दर अनुक्रमे ₹३०० आणि ₹१,७०१ प्रति क्विंटल होते. सोमवारी लासलगावमध्ये अंदाजे ८,१४६ क्विंटल उन्हाळी कांद्याचा लिलाव करण्यात आला, जो एकूण १०,५४६ क्विंटल नवीन खरीप आणि उन्हाळी कांद्याचा आहे. लासलगाव बाजारात साधारणपणे दररोज अंदाजे १५,००० क्विंटल कांदे मिळतात.



