लोकल न्यूज़

औंध महोत्सव २०२५ : “मेळा मनोरंजनाचा” — सन मराठी प्रस्तुत भव्य सांस्कृतिक सोहळा ७ डिसेंबरला

औंधमध्ये ७ डिसेंबर रोजी “औंध महोत्सव २०२५ – मेळा मनोरंजनाचा” हा दिमाखसनदार सांस्कृतिक सोहळा रंगणार

औंध महोत्सव २०२५ : “मेळा मनोरंजनाचा” — सन मराठी प्रस्तुत भव्य सांस्कृतिक सोहळा ७ डिसेंबरला

औंध, ता ०६:औंधमध्ये ७ डिसेंबर रोजी “औंध महोत्सव २०२५ – मेळा मनोरंजनाचा” हा दिमाखसनदार सांस्कृतिक सोहळा रंगणार असून  मराठी प्रस्तुत या महोत्सवाची संपूर्ण तयारी झाली आहे. औंध गटातील सांस्कृतिक वारसा, स्थानिक कला, उद्योग–व्यवसाय, शेती, शिक्षण आणि युवकविकासाला एकत्र व्यासपीठ मिळावे या उद्देशाने अंकुश भाऊ गोरे युवा मंच औंध (खटाव)व औंध जिल्हा परिषद गटाच्या नेत्या भारतीताई गोरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सिद्ध होत आहे.

 

या महोत्सवाचा आणखी एक विशेष हेतू म्हणजे शेतकरी बंधू-भगिनी, गृहिणी आणि माता-भगिनींना त्यांच्या दैनंदिन कष्टातून थोडासा विसावा, आनंद आणि करमणुकीचा क्षण देणे. वर्षभर मेहनत करणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी हा सांस्कृतिक मेळावा आनंदाची अनोखी भेट ठरेल, असा आयोजकांचा विश्वास आहे.

 

महोत्सवात सन मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध कलाकारांचे मनमोहक कार्यक्रम, तसेच अनेक नामवंत कलावंतांचे सादरीकरण होणार आहे. विशेष आकर्षण म्हणून लोकप्रिय कलाकार गौतमी पाटील औंधच्या रंगभूमीवर बहारदार कला सादर करणार आहे.

 

सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच उपस्थितांसाठी चहा, वडापाव, बिर्याणी, यांसारख्या खाद्यपदार्थांचे खास स्टॉलही उभारले जाणार आहेत, ज्यामुळे कुटुंबासह येणाऱ्या नागरिकांसाठी हा मेळावा आणखी आनंददायी ठरेल.

 

तसेच औंध गटाच्या वतीने ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार भाऊ गोरे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळाही आयोजित करण्यात येत आहे.

 

हा कार्यक्रम दिनांक ७ डिसेंबर, सायंकाळी ६ वाजता घाटमाथा – औंध येथे होणार असून प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक अंकुश भाऊ गोरे व सौ. भारतीताई गोरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!