लोकल न्यूज़

” यमाईच्या नावानं चांगभलं” नामात दुमदुमली औंध नगरी 

औंध प्रतिनिधी = महेश यादव 

 

औंध  = शारदीय नवरात्रीनिमित्त औंध येथील यमाई मंदिरात अष्टमीच्या परंपरेने चालत आलेल्या पालखी सोहळा (हर जागरण ) सोहळा आज मोठ्या गर्दीमध्ये भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

श्री यमाई देवी हे सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण मानले जाते.पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटकातून भाविक भक्त दर्शनासाठी अतिशय भक्तिभावाने औंध मध्ये देवीच्या दर्शनासाठी येत असतात.

अखंड नवरात्रात अतिशय चांगल्या प्रकारचे नियोजन या नवरात्र काळामध्ये बघावयास मिळते

 

अष्टमी दिवशी देवीचे विशेष पूजा केली जाते. त्या दिवशी पहाटे महा अभिषेक केला जातो. महाआरती केली जाते दुपारी देवीच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ झाल्यानंतर सासनकाठ्या, ढोल ताशे, गजरात फुलांची उधळण गुलाल उधळण आणि यमाई देवीच्या नावानं चांगभलं अशा जय घोषात भक्तीमय वातावरणात आजच्या यमाई देवीचा अष्टमीचा कार्यक्रम मोठ्या भक्तांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी जनतेचा लाडक्या व्यक्तिमत्व असलेल्याऔंध स्थानच्या अधिपती श्रीमंत श्री गायत्री देवी पंत प्रतिनिधी यांच्या हस्ते पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला यावेळी औंध पोलीस स्टेशन विभागाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय गणेश वाघमोडे साहेब

व समस्त यमाई भक्तांच्या उपस्थितीत हा अष्टमी (हरजागरण) सोहळा पार पडला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!