औंध — शिक्षण श्रमसंस्कार आणि समाजसेवा यांची कार्यशाळा म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना प्रा. प्रकाश शिंदे
औंध दि. 24 राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

औंध — शिक्षण श्रमसंस्कार आणि समाजसेवा यांची कार्यशाळा म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना
प्रा. प्रकाश शिंदे
प्रतिनिधी– महेश यादव (औंध )
औंध दि. 24 राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष औं शिक्षण मंडळाचे सचिव प्रदीप कणसे होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजना गीत गायन व प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. प्रकाश शिंदे होते . आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले की
राष्ट्रीय सेवा योजना (NSS) दिवस दरवर्षी २४ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने याच दिवशी १९६९ मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची औपचारिक सुरुवात झाली होती. या दिवशी विद्यार्थ्यांना स्वैच्छिक सामुदायिक सेवेद्वारे त्यांचे व्यक्तिमत्व आणि चारित्र्य विकसित करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय सेवा योजनेतून संस्कारक्षम युवक घडावेत .श्रम आणि समाजसेवेचे संस्कार कॅम्पमधून दिले जातात. समाजसुधारकावर चांगले संस्कार झाले म्हणून त्यांची आदर्श व्यक्तिमत्व तयार झालेली आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये विद्यार्थ्यांनी चांगल्या भावनेने काम करून समाज विकास साधावा. आपल्या पालकांना कोणत्याही प्रकारची मानहानी सहन करावी लागू नये अशा पद्धतीचे युवकांचे वर्तन असावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिव प्रदीप कणसे यांनी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचा 30 वर्षातील कामाचा आढावा घेतला. ते म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश राष्ट्र उभारणी , सामाजिक व मानसिक स्वच्छता, पर्यावरण संवर्धन हा आहे. विद्यार्थ्यांनी कलेचा वारसा जोपासणे गरजेचे आहे विविध प्रकारच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी राष्ट्र उभारणीस योगदान द्यावे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यावर श्रमाची संस्कार करणे गरजेचे आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत भंडारे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. औंध शिक्षण मंडळाचे सहसचिव प्रा. संजय निकम यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सचिन सरदेसाई यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुधाकर कुमकर यांनी केले आभार प्रा. दीपक कळेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनएसएस समिती सदस्य डॉ. सुखदेव भोसले प्रा.जगन्नाथ ननावरे अंजली भोकरे, पूजा जठार यांनी सहकार्य केले .कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते.



