साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त जिल्हा परिषद शाळेला अण्णाभाऊ साठे मंडळ यांच्याकडून एल.ई.डी टी.व्ही व पेन ड्राईव्ह भेट
प्रतिनिधी = महेश यादव

प्रतिनिधी= महेश यादव
औंध= दि 4 सालाबादप्रमाणे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त औंध मध्ये विविध उपक्रम पाहायला मिळतात व हे उपक्रम पार पाडण्यासाठी अण्णाभाऊ साठे मंडळ हे अग्रेसर असताना पाहावयास मिळते.
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला.
अण्णाभाऊ साठे ज्यावेळी शाळेत गेले तेव्हा त्यांना दुजाभावाची वागणूक मिळाली या कारणास्तव अण्णाभाऊंनी आपले शिक्षण हे केवळ दीड दिवसाचे केले. त्याकाळच्या परिस्थितीनुसार त्यांना ते शिक्षण अनुभवायला मिळाले त्यावेळी त्यांची आपल्या समाजाबद्दल अशी वागणूक पुढच्या पिढीला मिळू नये याकरिता त्यांनी यथाशक्ती बरेचसे प्रयत्न केले. अण्णाभाऊंच्या अशा या चांगल्या विचारांना पुढे नेत औंध मधील अण्णाभाऊ साठे मंडळ तितक्याच जोमाने आपल्या व आपल्यासारख्या समाजा साठी दुजाभाव न करता काम करताना दिसत आहेत.
औंध मधील जिल्हा परिषद येथील विद्यार्थ्यांची गैरसोय काय होते. याकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात आले जिल्हा परिषद शाळेमध्ये बहुदा गोरगरीब मुले शिक्षण घेताना दिसतात.त्यांना डिजिटल शाळा माहीत व्हावी व त्यांच्या शिक्षणात आधुनिक शिक्षण प्रणाली प्राप्त व्हावी याकरिता अण्णाभाऊ साठे मंडळ औंध येथील नागरिकांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने एलईडी टीव्ही व पेन ड्राईव्ह भेट दिला
यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य तानाजी इंगळे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष प्रवीण इंगळे, माधव इंगळे, सुहास इंगळे, रोहित इंगळे तसेच जिल्हा परिषद शाळेसाठी अडचणी येऊ नयेत म्हणून सतत सतर्क असणारे पैलवान कुलदीप इंगळे ,औंध ग्रामस्थ समस्त अण्णाभाऊ साठे मंडळ,विद्यार्थी/ विद्यार्थिनी, समस्त पालक वर्ग, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आदी सर्व उपस्थित होते.