बीएस्सी केमिस्ट्री विषयात कु. कोमल पवार हिला मिळाली शिवाजी विद्यापीठाची मेरिट स्कॉलरशिप
औंध महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

औंध 09 – बीएस्सी केमिस्ट्री विषयात कु. कोमल पवार हिला मिळाली शिवाजी विद्यापीठाची मेरिट स्कॉलरशिप
औंध प्रतिनिधी – महेश यादव
औंध महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
औंध, दि. ०९/०७/२०२५
राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध येथील रसायनशास्त्र विभागातील खबालवाडी ता. खटाव जिल्हा सातारा या ग्रामीण भागातील अतिशय शांत संयमी व अभ्यासू, एमएस्सी केमिस्ट्री प्रथम वर्षात शिकणारी विद्यार्थिनी कु. कोमल विकास पवार हिला बीएस्सी केमिस्ट्री तृतीय वर्षाच्या एप्रिल 2024 परीक्षेत ९० टक्के गुण घेऊन विद्यापीठातून गुणवत्तेत आल्याबद्दल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीने दिली जाणारी “शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती” मंजूर झाली असून रोख रक्कम दहा हजार रुपये देण्यात आले आहेत. प्राचार्य डॉ. श्रीकांत भंडारे म्हणाले, महाविद्यालयाच्या दृष्टीने ही बाब अतिशय अभिमानाची असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यामुळे प्रेरणा मिळेल. जिद, सातत्य, प्रामाणिकपणे अभ्यास केल्यामुळे व सर्व शिक्षकांनी नियमितपणे पूर्ण अभ्यासक्रम शिकवल्यामुळे हे यश मला मिळाले असे कुमारी कोमल यांनी सांगितले. तिच्या या यशाबद्दल औंध शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ना. अजित दादा पवार, चेअरमन श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी राणीसाहेब, सचिव श्री प्रदिप कणसे सर, सहसचिव श्री संजय निकम सर श्री दिपक करपे सर, विश्वस्त मा. हणमंतराव शिंदे, मा. राजेंद्र माने, प्राचार्य डॉ भंडारे सर तसेच रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. दिपक कळेकर, प्रा. राजेश खरटमोल, प्रा. गणपती भुजबळ प्रा. गजानन शिंदे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आदींनी कौतुक व अभिनंदन केले आहे.