ब्रेकिंग न्यूज –जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांवरील बंदी हटवली
जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांवरील बंदी हटवली

ब्रेकिंग न्यूज
औंध –जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांवरील बंदी हटवली

प्रतिनिधी– महेश यादव
औंध दि.१९ अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, केळवली-सांडवली धबधबा, वजराई धबधबा, कास पुष्प पठार, एकीव धबधबा, कास तलाव, बामणोली, पंचकुंड धबधबा, सडावाघापूर उलटा धबधबा, ऊरुल घाट शिव मंदिर धबधबा, रुद्रेश्वर देवालय धबधबा, ओझर्डे धबधबा, घाटमाथा धबधबा, लिंगमळा धबधबा तसेच महाबळेश्वर व पाचगणी पर्यटन स्थळ, व धरणे अशा पर्यटन स्थळांच्या परीसरात पर्यटकांमुळे गर्दी होत असते . त्यावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्बंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला होता तो आता स्थागित करण्यात आला आहें.
पावसाळ्यातील पर्यटनासाठी येणा-या नागरीकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता कडकनिर्बंध करण्यात आले आहेत.