औंध – 27 श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी - महेश यादव

औंध – 27 श्रीमंत गायत्रीदेवी
पंतप्रतिनिधी यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न
दिनांक 27.
औंध शिक्षण मंडळ, औंधच्या चेअरमन श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी राणीसाहेब यांचा वाढदिवस राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे निमित्ताने महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे औंध शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ विश्वस्त मा. हणमंतराव शिंदे, विश्वस्त राजेंद्र माने, सचिव प्रदीप कणसे सर , सहसचिव दीपक करपे सर यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर केक कापून राणीसाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विश्वस्त मा. हणमंतराव शिंदे यांनी श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी औंध व औंध परिसरामध्ये केलेल्या विकास कामांचा व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कोरे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. सर्जेराव भोसले सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.