1लाख ८२ हजाराचा दरोडा टाकणाऱ्या सराईत आरोपींना पुसेगाव पोलिसांनी केले जेरबंद
पुसेगाव पोलिसांची धडक मोहीम

पुसेगाव पोलिसांची धडक मोहीम
1लाख ८२ हजाराचा दरोडा टाकणाऱ्या सराईत आरोपींना पुसेगाव पोलिसांनी केले जेरबंद
प्रतिनिधी — महेश यादव
पुसेगाव –दि 23. पुसेगाव कमी पैशात सोने देतो असा बहाना करून डिस्कळ तालुका खटाव येथील फासे पारधी समाजातील सराईत गुन्हेगार यांनी जबरदस्तीने मारहाण करून १ लाख ८२ हजार रुपयाचा दरोडा टाकणाऱ्या या सराईत आरोपींना पुसेगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सातारा अवघ्या आठ तासात पकडून जेरबंद केले.
पोलिसांकडून मिळाली माहिती अशी तक्रारदार प्रवीण महाद् मेचे वय २३ वर्ष राहणार पिंपरी चिंचवड व देवराज अमित शिंदे यांची ओळख झाली होती. ओळखी दरम्यान एकमेकांना नंबर दिला कारणाने, व्हाट्सअप वरून त्यांची बोलणी चालू होती. दिनांक ३०/४/२०२५ रोजी प्रवीण महाद् मेचे यांच्या बहिणीचे लग्न होते. ते स्टेटस मेचे यांनी ठेवले होते. तोच धागा पकडून, देवराज शिंदे याने मेटे यांना फोन केला माझ्याकडे सोने आहे मी तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी कमी पैशांमध्ये सोने देतो असे सांगितले. परंतु सोने काही दिले नाही. त्यानंतर देवराज ने फोन करून एक लाख वीस हजार रुपये घेऊन ये मी तुला माझ्याकडील दहा
तोळे सोने देतो असे सांगितले. व मेचे यांनाही सोने खरेदी करायचे असल्याने त्यांनी होकार दिला, त्यानंतर रोजी देवराज शिंदे याने प्रवीण महाद् मेचे यांना डिस्कळ येथील लोकेशन पाठवले. त्या लोकेशन नुसार प्रवीण महादु मेचे व त्याचे मित्र ऋषिकेश गोविंद भोर हे १९/६/ २५ दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास दोघे डिस्कळ येथे आले. त्यावेळी देवराज शिंदे यांनी आपल्या राहत्या घरी नेऊन आपल्या घरातील व फलटण येथील पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यानंतर तक्रारदार प्रवीण महाद् मेचे याने मी तुला एक लाख वीस हजार रुपये देतो तू मला दहा तोळे सोने देणार होता ते अगोदर दाखव असे म्हणाला त्यावेळी देवराज यांनी त्याच्याकडील पाच तोळे सोने त्याला दाखवले त्यामुळे कमी किमतीत सोने देईल असा मेचे यांचा विश्वास बसला, मेचे व त्यांचा मित्र ऋषिकेश यांनी जाऊन एटीएम मधून एक लाख वीस हजार काढले व देवराज शिंदेच्या घरी गेले. व खाटेवर बसले. देवराज ची आजी शिक्षण शिंदे तू माझ्याकडे एक लाख वीस हजार रुपये दे माझा नातू तुला दहा तोळे सोने देईल त्यावेळी
तक्रारदार प्रवीण मे चे म्हणाले तू मला अगोदर सोने दे मग मी तुम्हाला पैसे देतो असे म्हणाला व खिशामध्ये पैसे असल्याचे दाखविले. त्याचवेळी देवराज अमित शिंदे, शानू अमित शिंदे, शिक्षण लाहोर शिंदे, सुषमा सुविचार शिंदे, मीना लाहूर शिंदे, सुमित सुविचार शिंदे, सर्व राहणार डिस्कळ तालुका खटाव जिल्हा सातारा अनिल उर्फ अनिमोल गोगाच्या शिंदे राहणार फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा व इतर चार ते पाच अनोळखी मुले यांनी प्रवीण मेचे व त्याचा मित्र ऋषिकेश गोविंद भोरे याला चक्काबुक्की करून त्यांना पकडून खाली पाडून त्यांच्या खिशातील रोख रक्कम एक लाख वीस हजार रुपये शिक्षण लाहोर शिंदे हिने खिशात हात घालून जबरदस्ती हिसकावून काढून घेतले, आणि त्याच वेळेस प्रवीण मेते यांच्या कानातील दोन सोन्याच्या बाळ्या जबरदस्तीने अनिल उर्फ अनमोल गोगाजा शिंदे यांनी हिसकावून तोडून घेतले, तसेच दोघांच्या खिशातील मोबाईल खिशात हात घालून जबरदस्तीने घेतले व तेथून देवराज शिंदे व तिथे असणारी मुले ही राखाड्या रंगाच्या चार चाकी गाडी क्रमांक एम
एच १२बीपी ३८ ९६ नंबर असलेल्या गाडीतून पळून गेले. तिथे असणाऱ्या महिला घराच्या बाजूने पळून गेल्या एकूण रोख रक्कम सोन्याचे दागिने मोबाईल असा एकूण एक लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज दरोडा टाकून करून नेला. गुन्ह्यातील फासेपारधी समाजातील सराईत आरोपीचा पुसेगाव पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन मोहीम राबवून आठ तासाच्या आत कसून शोध घेऊन पळून गेलेल्या वाहनासह एकूण तीन लाख ८२ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. व अटक केली. पुसेगाव पोलिसांच्या या उल्लेखनीय कारवाईमुळे दरोडा, जबरी चोऱ्या, घरफोड्या या गुन्ह्यांना आळा बसणार आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी कोरेगाव सोनाली कदम, पो. नि. स्था. गु.शा. अरुण देवकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी संदीप पोमन, पोलीस उपनिरीक्षक सुधीर येवले, सहाय्यक पोलीस फौजदार सुधाकर भोसले, दीपक बर्गे चंद्रहार खाडे, पोलीस हवालदार योगेश बागल, प्रमोद कदम, यांनी सदरची कारवाई केली