ड्रीम सोशल फाउंडेशन संस्थापिका सौ अनुराधा प्रभाकर देशमुख (काकी साहेब )त्यांचा वाढदिवस औंध मध्ये मोठ्या उत्साहात साजरा
औंध प्रतिनिधी --महेश यादव

ड्रीम सोशल फाउंडेशन संस्थापिका सौ अनुराधा प्रभाकर देशमुख (काकी साहेब )त्यांचा वाढदिवस औंध मध्ये मोठ्या उत्साहात साजरा
औंध प्रतिनिधी महेश यादव
औंध — 12 मे रोजी औंध मध्ये सौ अनुराधा प्रभाकर देशमुख( काकी साहेब )यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात मोठ्या संख्येने साजरा करण्यात आला यावेळी वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम सुद्धा राबवण्यात आले व आलेल्या सर्व महिलांना टिफिन बॉक्स वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाविषयी वेळोवेळी उपयोगी पडत असलेले काकी साहेबांच्या “स्मार्ट लेडी” हा उपक्रमाबाबत व ड्रीम सोशल मीडिया फाउंडेशन हे व्यक्तींपर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत कसे उपयोगी पडते हे ही सर्व माहिती काकी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजक करणारे पैलवान कुलदीप इंगळे (आप्पा) यांच्या माध्यमातून वेळोवेळी सांगण्यात येते तसेच वेळोवेळी जनतेच्या प्रश्नांच्या कडे बारकाव्याने बघणारे. सतत जनतेच्या प्रश्नांकडे पाठपुरावा करीत असतात. त्यांनी बऱ्यापैकी मातंग समाजातील पाणी प्रश्न, गटर, रस्ते अशा प्रश्नांकडे ही जातीने पाठपुरावा करीत आहेत पैलवान कुलदीप इंगळे आप्पा हे माननीय प्रभाकर देशमुख साहेब यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख आहे.
काकी साहेबांचे “स्मार्ट लेडी ” हा उपक्रम बऱ्यापैकी सर्वसाधारण महिलेपर्यंत नक्कीच पोहोचतो. आता असा प्रतिसाद महिला वर्गाकडून पहायला मिळाला.
काकी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पैलवान कुलदीप इंगळे आप्पा यांनी आयोजन केला त्याबद्दल महिला वर्गातून त्यांच्या गोड कौतुकही केले.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती औंध ग्रामपंचायत सदस्य शितल देशमुख,शहाजी यादव, ओंकार इंगळे., गणेश देशमुख,गणेश इंगळे,भगवान यादव (नाना), अंबादास यादव,शिवम इंगळे, सचिन साठे, पांडुरंग इंगळे, अजय इंगळे, तसेच ग्रामस्थ, अण्णाभाऊ साठे मंडळ व औंध ग्रामस्थ उपस्थित होते
- या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रसिद्ध समाजसेवक, कवी श्री संदीप यादव यांनी केले.