औंध –15 अंश सेल्सिअस तापमानामध्ये केदार कंठा सर करणारी अन्वी घाटगे हिचे औंध ग्रामस्थांकडून स्वागत
औंध प्रतिनिधी -- महेश यादव

औंध –15 अंश सेल्सिअस तापमानामध्ये केदार कंठा सर करणारी अन्वी घाटगे हिचे औंध ग्रामस्थांकडून स्वागत
औंध प्रतिनिधी — महेश यादव
औंध –15 अंश सेल्सिअस तापमानात हिमालय पर्वतरांगेतील केदार कंठा (उत्तराखंड ) हे समुद्रसपाटीपासून सुमारे 12,500 फुट उंचीचे बर्फाच्छादित शिखर 5 वर्ष 6 महिने असं तिचं वय असणाऱ्या गिर्यारोहक अन्वी घाटगे हिने 19 फेब्रुवारी या दिवशी केदार कंठा या ठिकाणी भगवा फडकवून छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने मानवंदना दिली होती.अशा या अन्वी घाटगे चे औंध ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.
एकंदरीत पाहता अन्वी चा प्रवास हा असा होता
1) दिनांक 16.- देहरादून ते साक्री असा 210 किलोमीटरचा प्रवास
2) दिनांक 17- उणे 6 अंश सेल्सिअस तापमानामध्ये चढाई सुरुवात
3) दिनांक 18 – प्रतिकूल परिस्थितीमध्ये चढाई करत बेस कॅम्प मध्ये दाखल.
4) दिनांक 19 – मध्यरात्री दोन वाजता चढाईस सुरुवात सकाळी 7 वाजता शिखर सर करण्यात तिला यश आले.
त्याचबरोबर अन्वीने केलेले आजपर्यंतचे रेकॉर्ड हे 1) 5 वर्ल्ड रेकॉर्ड
2) 6 एशिया बुक ऑफ रेकॉर्ड
3) 6 इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड
4) 62 गडकोट दुर्ग संवर्धन व स्वच्छता मोहीम
5) 250हुन अधिक व्यक्ती व संस्थांकडून सन्मानित
करण्यात आले
6) 2100 देशी झाडांची लागवड
अशी ही ओळख असणाऱ्या अन्वी घाटगे हिचे औंध ग्रामस्थांनी मोठ्या कौतुकाने स्वागत केले यावेळी उपस्थित श्री संदीप गुरव श्रीगणेश हरिदास, श्री वसंत जानकर, श्री आनंदा घोडके, पत्रकार महेश यादव, श्री प्रदीप गुजर, श्री अनिल माने,नवाज मोदी समस्त नवयुग तरुण मंडळ, गुरव समाज, तसेच इतर ग्रामस्थ ही उपस्थित होते.