औंध — श्री ज्ञानेश्वर लक्ष्मण यादव( औंध) यांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा उत्कृष्ट गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान
औंध प्रतिनिधी --महेश यादव

औंध — श्री ज्ञानेश्वर लक्ष्मण यादव( औंध) यांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा उत्कृष्ट गुणवंत कामगार पुरस्कार प्रदा
औंध प्रतिनिधी –महेश यादव
औंध – दिनांक-1 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्यामार्फत सालाबद प्रमाणे दिला जाणारा उत्कृष्ट गुणवंत कामगार पुरस्कार सन 2024 ते 25 या सालचा पुरस्कार औंध चे रहिवासी असलेले श्री ज्ञानेश्वर लक्ष्मण यादव( औंध) यंत्रचालक यांना बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री धर्मराज पेढकर यांच्या हस्ते बारामती येथे 1 मे कामगार दिनानिमित्त उत्कृष्ट गुणवंत कामगार हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .
हा पुरस्कार विशेषतः वीज वितरण कंपनीमध्ये अंतरिक विभागात काम करत असताना अपघात सेवा, सुरळीत वीज सेवा, ग्राहकांचे काळजी, अचानक उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्येचे निवारण करणे, कामाच्या ठिकाणी देखभाल करणे इत्यादी क्षेत्रात कर्तव्यदक्षता घेणे, आपल्या कामाच्या ठिकाणी निष्ठा व श्रम यासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो.
श्री ज्ञानेश्वर लक्ष्मण यादव हे गेले 15 वर्ष वीज वितरण कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आठ ते दहा उपकेंद्रांमध्ये उत्कृष्ट व पूर्ण इमानदारीने सेवा बजावली आहे. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल बारामतीचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री पेढकर साहेब, कार्यकारी अभियंताश्री हळनोर साहेब, कार्यकारी अभियंता श्री मस्के साहेब, श्री पाटोळे साहेब, उपकार्यकारी अभियंता श्री बोधे साहेब, श्री मोहिते साहेब सर्व सहकारी मित्र, सर्व तांत्रिक शक्ती युनियन, तसेच औंध मधील सर्व ग्रामस्थांनी व मित्र मंडळांनी श्री ज्ञानेश्वरी लक्ष्मण यादव यांना कौतुकाची थाप व शुभेच्छांचा वर्षाव केला.