पुसेगाव—पुसेगाव नं १ शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

पुसेगाव—पुसेगाव नं १ शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन
उत्साहात संपन्
प्रतिनिधी — महेश यादव
पुसेगाव– सर्व कलागुणांना वाव देणारे अशी, ज्या शाळेच्या बद्दल कौतुकाची थाप कायम ऐकू येते अशी ही जि.प. शाळा, पुसेगाव नं.१ येथे झालेल्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन खटाव तालुका ग.शि.अ. सौ.सोनाली विभूते मॅडम, मा.आमदार श्री.महेश शिंदे यांच्या सुविध्य पत्नी सौ.प्रियाताई शिंदे, पुसेगाव देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मा. श्री डॉ. सुरेश जाधव यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी डायट प्राचार्य मा.श्री कोरडे साहेब केंद्रप्रमुख श्री.गावडे साहेब, श्री खोत साहेब, श्री दिडके साहेब,श्री. बाळासाहेब जाधव हे उपस्थित होते.
शाळेचा पट १६८ असून सुमारे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकूण २० कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये गणेश वंदना, महाराष्ट्राची लोकधारा, वारकरीगीत, शेतकरी गीतांनी अप्रतिम सादरीकरण केले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर हृदयद्रावक छावा थीमचा शाडो एक्टने दाखविलेल्या प्रसंगाने सर्वांची मने हेलावून गेली.
ज्योतिबा गीतामध्ये प्रत्यक्ष बगाड व बैलगाडी दाखवून गीतामध्ये जीवंतपणा आणला गेला, मंगळागौर, लावणी ४थी मधील विद्यार्थीनींनी अप्रतिम नृत्याविष्कार व उत्कृष्ट ड्रेपरी सह सादर केली.
रिल रिमिक्स,पुष्पा, लिखोगे पड़ोगे, रेट्रो थीम शिवकन्या, या गाण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. व वाहवा मिळवली.
या कार्यक्रमास शा.व्य.स. अध्यक्ष विशाल देवकर, उपाध्यक्षा सौ.निकम श्री ज्ञानेश्वर कुंभार, श्री अनिकेत पाटील, श्री महेंद्र कुलकर्णी, सर्व महिला सदस्या, शाळेच्या मुख्या.सौ. कल्पना चव्हाण, वर्धनगड केंद्रातील व तालुक्यातून विविध भागातून बहुसंख्येने शिक्षक व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.मिनाक्षी खोत यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ. भारती पोळ, सौ.स्नेहा पवार,श्री ब्रह्मदेव ननावरे, सौ. मिनाक्षी खोत, सौ.माधुरी तोडकर या शिक्षकांनी व कोरिओग्राफर श्री. वेंकटेश कांबळे सर यांनी खूप कष्ट घेतले.