औंध परिसरात अवकाळी पावसाने झोडपले
अवकाळी झालेल्या पावसाने बाजार करूंचे तारांबळ , तर शेतकऱ्यांचे झाले नुकसान

औंध प्रतिनिधी – महेश यादव
औंध येथे व परिसरात मंगळवारी पावसाने दमदार हजेरी लावली. जोरदार वारा, विजेचा कडकडाट, यामुळे या शेतातील पिकांचे चे नुकसान झाले.ज्वारी, गहू ज्या शेतकऱ्यांचे कडून शेतांत पडले आहें, तसेच ज्यांच्या वैरानी भिजल्या आहेत त्यांचे नुकसान झाले आहें तसेच औंध येथील आठवडी बाजारात असतो अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सुमारे एक तास झालेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
परिसराला गेले दोन-तीन दिवसापासून पावसाने हुलकावणी दिली होती. मंगळवारी दिवसभर कडक उन्ह जाणवत होते.
दुपारी चार च्या सुमारास अचानक ढग जमून येऊन विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट व जोरदार वाऱ्यासह सायंकाळी सहाला वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांचीही दाणादाण झाली आठवडी बाजार असल्याने आसपासच्या खेड्यातील शेकडो शेतकरी आपल्या शेतातील पालेभाज्या घेऊन आले होते. पण सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी, व्यापारी यांचे नुकसान झाले. दमदार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. तर रस्त्यावरून पाणी धो धो वाहत होते. मागील काही दिवसांपासून नागरिक उन्हामुळे हैराण झाले होते परंतु मंगळवारी झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने थोडेसे का होईना सुखावले आहेत. अचानक झालेल्या पावसामुळे औंध विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला होता
अचानक झालेल्या पावसामध्ये हवेत गारवा छान जाणवत असला तरी शेतकऱ्यांचे बऱ्या पैकी नुकसान झाले हे नक्की