औंध —औंध महाविद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी बनसोडे हिस महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

औंध प्रतिनिधी –महेश यादव
औंध दिनांक 16 :
आंतरराष्ट्रीय पातळीवरील जुदो डीफ खेळ प्रकारातील सुवर्णपदक विजेती राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी बनसोडे हिस नुकताच महाराष्ट्र शासनातर्फे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त महाविद्यालयात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत भंडारे होते. अध्यक्षपदावरून बोलताना ते म्हणाले की आयुष्यात खेळाचे महत्व खूप आहे .
कठोर परिश्रम, जिद्द व व्यायामाची आवड असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी बनसोडे हिने शासनाचा पुरस्कार मिळवून सिद्ध केले आहे. तिच्या या नेत्र दीपक यशामध्ये तिचे आई-वडील व सर्व मार्गदर्शक यांचा महत्त्वाचा वाटा आहे. अशाच प्रकारचे यश मिळवत तिने ऑलिम्पिक मध्ये प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. सुधाकर कुमकर यांनीही शुभेच्छा देऊन तिच्या यशस्वी कामगिरीचा अल्प परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुहन मोहळकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ श्रीशैल्य कोरे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,प्रशासकीय सेवक उपस्थित होते.