राजनीति

वडूजच्या नगराध्यक्षा सौ. मनिषा काळे यांचा अखेर राजीनामा

मनमानी व निष्क्रियतेचे आरोप बिनबुडाचे

 

वडूज प्रतिनिधी -लालासाहेब माने पाटील

: वडूज नगरपंचायतीच्या सदस्यांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा, विचार विनीमय होण्या अगोदरच नगराध्यक्षा सौ. मनिषा रविंद्र काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषद घेवून त्यांनी हा निर्णय जाहीर केला. यावेळी काही सदस्यांनी त्यांच्यावर मनमानी व निष्क्रियतेचे केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले. तसेच कचर्‍याचा गंभीर विषय असल्या कारणानेच राजीनामा लांबल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

यावेळी बोलताना सौ. काळे यांनी सांगितले की, आपण स्वत:च्या ताकतीवर प्रभाग क्र. २ मधून अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या माध्यमातून आपणास नगराध्यक्ष पदावर काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. मात्र या पक्षाबरोबर राहून विकासकामे होत नसल्याच्या कारणावरुन भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आ. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज शहरामध्ये आजपर्यंत कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली. त्यामध्ये विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविणे ५ कोटी, वैशिष्ठपुर्ण योजना मे २०२३ रोजी ४० लाख, वैशिष्ठ्यपूर्ण योजना ऑक्टोंबर २०२३ रोजी ५ कोटी, वैशिष्ठपूर्ण योजना डिसेंबर २०२३ रोजी ३० लाख, वैशिष्ठपूर्ण योजना फेब्रुवारी २०२४ रोजी १ कोटी ४५ लाख, वैशिष्ठपूर्ण योजना मार्च २०२४ रोजी ५ कोटी ६० लाख, जिल्हा नगरोत्थान योजना १ कोटी ९५ लाख, नागरी दलितेत्तर योजना ७२ लाख ५० हजार, ८९ लाख १० हजार, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजना १ कोटी ४६ लाख, अमृत २.० पाणी पुरवठा योजना ४६ कोटी ६५ लाख, अग्नीशामक योजना १ कोटी ७१ लाख, स्वच्छ सर्व्हेक्षण १ कोटी ६७ लाख, १५ वा वित्त आयोग ३ कोटी ४६ लाख, वैशिष्टपूर्ण योजना २०२४-२५ रोजी ४० लाख, वैशिष्टपूर्ण योजना २०२५ रोजी ९० लाख, विशिष्ठ नागरी सुविधा ९ कोटी, भूयारी गटर योजना ५ कोटी २० लाख, जिल्हा नगरोत्थान योजना सन २०२४-२५ २ कोटी ५ लाख, नागरी दलितेत्तर योजना सन २०२४-२५ ला १ कोटी ३ लाख, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना सन २०२४-२५ ला १ कोटी १ लाख अशी एकूण १४५ कोटी ७ लाख रुपयांची कामे आपल्या कार्यकालात झाली आहेत.

चौकट : १) कोट्यावधी रुपयांची विकासकामे झाली आहेत. यापैकी अनेक महत्वाच्या कामांची भूमीपूजने, उद्घाटन शुभारंभ, लोकार्पन सोहळे पक्षाचे नेते ना. जयकुमार गोरे यांच्यासह बहुतांशी नगरसेवक तसेच शहरातील मान्यवर कार्यकर्ते तसेच जनता जनार्दनाच्या उपस्थितीत पार पडले आहेत. असे असताना आपल्यावर निश्क्रियतेचे आरोप करणार्‍यांची किव करावीशी वाटते. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

२) ना. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांना बरोबर घेवून काम करत होतो. लोकशाहीमध्ये सर्वांनाच पद मिळण्याची अपेक्षा असते. मात्र पदाची महत्वकांक्षा व वैयक्तिक लालसेपोटी काही सदस्यांनी टोकाची भूमिका घेत आपणाविरोधात व्यक्तिगत आरोप केल्याबद्दल नगराध्यक्षा सौ. काळे यांनी तीव्र नाराजी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!