सातारा– मा. श्रीमंत रुणालीराजे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थित भटके विमुक्त आदिवासी महिलांसाठी 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त प्रबोधन कार्यक्रम उत्साह संपन्न. औंध प्रतिनिधी (महेश यादव )
प्रतिनिधी --महेश यादव

छाया –महेश यादव (औंध )
समावेशक सामाजिक विकास संस्था औंध आणि छत्रपती शिवाजी कॉलेज अर्थशास्त्र विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त भटके विमुक्त आदिवासी समाजातील महिलांसाठी प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता छत्रपती शिवाजी कॉलेज अर्थशास्त्र विभागाच्या सहभागृहात झालेल्या या कार्यक्रमात महिलांच्या विविध समस्येवर चर्चा करण्यात आली
कार्यक्रमाची सुरुवात यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क कॉलेज जकातवाडी येथील विद्यार्थिनी सादर केलेल्या पथनाट्याने झाली व्यसनाधीनता आणि बालविवाह दुष्परिणाम यांसारख्या विषयावर जनजागृती करणारे पथनाट्य सादर करण्यात आली.
समावेशक संस्थेच्या अध्यक्षा शैला यादव यांनी प्रास्ताविक केले त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली आणि महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले कार्यक्रमात शासकीय नोकरी मिळालेल्या भटके विमुक्त समूहातील युवक युवतींना समावेशक प्रेरणात ज्ञान गौरव सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले छत्रपती रुणाली राजे शिवेंद्रसिंह राजे भोसले या कार्यक्रमाला उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले जिल्हाधिक्षक समीर शेख यांनी संस्थेच्या सुरु असलेल्या कामाला शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे.
मा. श्रीमंत रूणालीराजे शिवेंद्रसिंहराजे भोसले मा. भगवान कांबळे निवडणूक विभाग प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी सातारा, मा. श्री.डॉ. प्राचार्य राजेंद्र मोरे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, मा. डॉ. कांचन जगताप सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग सातारा. मा. श्री . सतीश शीला राजकुमार बुद्धे गटविकास अधिकारी सा मा. श्री डॉ. समीर शेख अधीक्षक सातारा,
मा. कु. शैला हिराबाई वसंत यादव समावेशक संस्था अध्यक्ष,
मार्गदर्शक वैजयंती ओतारी,
अनिलकुमार वावरे उपप्राचार्य अर्थशास्त्र विभाग छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा,
आप्पाराव राठोड भटके विमुक्त संयोजन समिती महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी,
समावेशक संस्था सचिव रमेश जावळे, शिल्पा चव्हाण सातारा, तालुका समन्वयक ज्योती जाधव वाई तालुका, समन्वयक सीमा रविढोणे जावळी तालुका समन्वयक, कराड तालुका युवा संघटक सनी जावळे खटाव तालुका समन्वयक वैभव यादव, समावेशक प्रतिनिधी कुंदन कुडाळकर, रमेश यादव, अरुण जावळीकर, युवराज मोहरकर कमल माळी, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क कॉलेज जकातवाडी सातारा कॉलेजचे विद्यार्थी
समावेशक प्रेरणा ज्ञानगौरव सन्मान पुरस्कार विजेते. अनिशा मदने कराड शेरे, काशिनाथ कुडाळकर नातेपुते, आकाश निळकंठ गाडे तळेगाव, भटके विमुक्त आदिवासीं समूहातील सर्व महिला लीडर प्रतिनिधी उपस्थित होते.
सूत्रसंचालन समाजकार्य महाविद्यालय सातारा विद्यार्थी अविनाश सावंत यांनी केली.