*औंध मध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरता मोफत तपासणी ते उपचार आरोग्य कॅम्पचे आयोजन* .
या तपासणी कॅम्प मुळे गरिबांना फायदा

*औंध मध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरता मोफत तपासणी ते उपचार आरोग्य कॅम्पचे आयोजन*
औंध प्रतिनिधी – महेश यादव
औंध : खटाव तालुक्यातील औंध येथे सातारा जिल्हा उपाध्यक्ष असंघटित कामगार सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट माननीय पैलवान कुलदीप इंगळे यांच्या माध्यमातून तर माननीय प्रभाकर जी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांकरता मोफत तपासणी ते उपचार योजना कॅम्प घेण्यात आला.
कॅम्पचे आयोजन औंध मधील अण्णाभाऊ साठे सभागृहात घेण्यात आले होते. सकाळी दहाच्या सुमारात कॅम्प चालू झाला ते दुपारी चार वाजेपर्यंत लोकांनी कॅम्पला प्रतिसाद दिला यामध्ये औंध मधील तब्बल 85 कुटुंबांनी तर सर्वसाधारण साडेचारशे सदस्यांनी याचा लाभ घेतला.
कॅम्प मध्ये लोकांचे ब्लड सॅम्पल घेत मिळणाऱ्या विनामूल्य सेवा याचा लाभ कसा मिळेल याची माहिती देण्यात आली . यामध्ये रुग्णासाठी फिरते वैद्यकीय कक्ष,प्रती लाभार्थीला प्रतिवर्षी त्यांच्या आजारानुसार रुग्णालयात भरती व उपचार करण्यात येईल तसेच प्रति लाभार्थीला प्रतिवर्षी त्यांच्या आजारनुसार औषधे वितरण करण्यात येतील.तसेच बांधकामांच्या ठिकाणी नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारास अपघात झाल्यास रुग्णालयांमध्ये भरती करून उपचार पद्धती होतील याची सेवा विनामूल्य असेल.या सुविधांचा लाभ मिळेल.
इथून पुढेही कामगार व त्यांच्या कुटुंबा करता असे अनेक कॅम्प आम्ही औंध मध्ये घेऊ असे पै कुलदीपजी इंगळे यांनी सांगितले.