औंध – औंध महाविद्यालयात विद्यार्थी पालक मेळावा उत्साहात संपन्न
औंध - पालक मेळावा उत्साहात संपन्न

दि. 3 मार्च 2025 : राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयात आजी माजी विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. कोरे एस. एम म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जसे शिक्षक जबाबदार असतात तसेच पालकांचेही लक्ष आपल्या पाल्याकडे असणे गरजेचे आहे, शिक्षक विद्यार्थ्याला चार भिंतीच्या मधील औपचारिक शिक्षण देतो तर पालक हा त्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतो. पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष दिले तर वाईट वळणाकडे जाणाऱ्या मुलांचा विकास होऊ शकतो . शिक्षकांच्या बरोबरच पालकांची ही जबाबदारी आहे की, आपला पाल्य शिक्षणाबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी आहे किंवा त्याचे मित्र मैत्रीण कसे आहेत याकडे लक्ष दिलं पाहिजे. मेळाव्यामध्ये बहुसंख्य पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रती असणारे आपली काळजीची भूमिका व्यक्त केली. यानिमित्ताने काही आदर्श पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रकाश शिंदे यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. अजित देसाई यांनी केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.